१४ वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची अकोल्यातील घटना अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक आहे.

 

Crimenews १४ वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची अकोल्यातील घटना अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल होताच अकोला पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन मोडमध्ये येत तासाभराच्या आतच त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात. आता पोलिस लवकरात लवकर कारवाई करतील. व या हरामखोराला कठोरातील कठोर शिक्षा होईलच कारण महिलांची सुरक्षा व सन्मानासाठी आपले महायुती सरकार कटीबद्ध आहे.

पण या निमित्ताने एक गोष्ट पुन्हा समोर आलीय ती ही की, या प्रकरणातील आरोपी हा कुटुंबातीलच नातेवाईक होता. ओळखीतीलच व्यक्ती आपल्या मुला-मुलींवर इतक्या अघोरी थराला जाऊन अत्याचार करेपर्यंत पालक कसे काय अज्ञान राहिले?

आपल्या घरात येणाऱ्या व्यक्ती- नातेवाईक आपल्या मुलाबाळांशी कसे वागताहेत, याबाबतही पालक म्हणून आपण सतर्क राहायला हवं. मुलांना अशा व्यक्तींसोबत घरात एकटं सोडणं देखील धोकादायक आहे.https://www.suryamarathinews.com/जाफ्राबाद-शहरात-cctv/

अनेकदा मुलेही भीतीपोटी अशा घटना सांगण्यास धजावत नाहीत. त्यामुळेच पालक म्हणून मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच अशा अपप्रकारांबद्दल मुले मनमोकळेपणाने आणि धिटाईने आपल्याशी बोलू शकतील…१४ वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची अकोल्यातील घटना अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक आहे.

Leave a Comment