अतिक्रमण हटविण्यासाठी परस्परविरोधी उपोषण दोन गट एकमेकांसमोर एकाच जागी उपोषणास बसले या प्रकरणी तोडगा काढण्यास प्रशासन अपयशी येथील घटना…

0
473

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी
जळगाव जा

दिनांक 22 सप्टेंबर/ जळगाव जामोद

तालुक्यातील जय भवानी चौकातील टपऱ्याचे अतिक्रमण उचलण्यासाठी वार्ड क्रमांक 2 व 3 मधील मोहन सिंह राजपूत श्रीमती गीता बाई बैस किशोर वंडाळे व सविता वंडाळे यांनी त्यांच्या घरासमोरील तीन टपऱ्या उचलण्यासाठी प्रथम तक्रार अर्ज दिनांक 17 ऑगस्ट व 15 सप्टेंबर ला सुनगाव व ग्रामपंचायत प्रशासनास दिला होता या अर्जावर गटविकास अधिकारी यांनी अधिक्रमण उचलण्यात यावे हा शेरा दिलेला आहे तरी आतापर्यंत अतिक्रमणावर कुठलीही कारवाई न केल्यामुळे दिनांक 22 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजेपासून मोहन सिंह व इतर चार जण ग्रामपंचायत समोर उपोषणास बसले यावेळी अर्जात नमूद अतिक्रमणधारकांना सुद्धा दिनांक 18 विरोधी तक्रार देत स्थानिक लोकांचे अतिक्रमण हटविण्यात यावे ही भूमिका होत उपोषणाची भूमिका घेतली दिनांक 22 ला ग्रामपंचायत समोर एकाच दिवशी एकाच वेळी व एकाच जागेवर दोन परस्परविरोधी मागण्यांचे उपोषण सुरू झाल्याने गावात एक प्रकारे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याप्रकरणी सर्वप्रथम प्रशासक राजपूत यांनी उपोषण मंडपास भेट देत दोन्ही गटांशी चर्चा करून उपोषण सोडण्याचा अपयशी प्रयत्न केला त्यानंतर गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासन दाखल होऊन त्यांनी ह्या प्रकरणी उपोषण सोडविण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांनाही अपयश आलेले पाहून पुढील तणावग्रस्त स्थिती रोखण्यासाठी स्वतः जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव आपल्या ताफ्यासह सुनगाव ग्रामपंचायत मध्ये येऊन दोन्ही गटासह बंदद्वार चर्चा करून प्रकरण समंजस पणे मिटवण्याचे प्रयत्न केले ही चर्चाही विफल ठरली, परंतु यावेळी चर्चेनंतर टपरीधारक यांनी उपोषण मागे घेतले रात्री उशिरापर्यंत गावात पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन हे उपोषण मंडपाजवळ कोरोना व जमाबंदी च्या पार्श्‍वभूमीवर गर्दी नियंत्रणाचा प्रयत्नात होते,
दिनांक 22 ला रात्री उशिरापर्यंत श्री मोहन सिंह व इतर चार यांचे उपोषण सुरू होते दिवसभर पावसात हे उपोषण सुरू होते एकंदरीत प्रशासन व पोलिस हे प्रकरणात तोडगा काढण्यात अपयशी ठरले याप्रकरणी काही राजकारणी मंडळी पडद्याआडून सूत्रे हलवत आपली राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत असल्याची गावात खमंग चर्चा होती दिवसभर याप्रकरणी उद्या प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्व सुनगाव वासियांची लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here