अल्लीपूर येथे नाबालिक मुलीवर अत्याचार पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

0
448

 

सचिन वाघे प्रतिनिधी

अल्लीपूर :- आरोपी याने दि.1 ऑगस्ट 2020 ला राहुल चंदु बालबन्सी, रा. कानगाव, ता. हिंगणघाट,जि. वर्धा. यांनी अल्पवयीन फिर्यादीचा जवळीक साधण्यासाठी पाठलाग करुन तिच्याशी मैत्री करुन तिला त्याचे मित्राचे घरी कोणी नसताना घेऊन जाऊन तिचे इच्छाविरुद्ध तिचेशी बळजबरीने अत्याचार केला, त्यानंतर फिर्यादी त्याचेशी बोलत नसल्याने तिला एकदा मारहाण केली होती. दि. 19 नोव्हेंबर2022 रोजी फिर्यादी ही अल्लीपूर येथून कॉलेज वरुन घरी जात असताना कानगाव बस स्टॅन्ड वर आरोपी तिला भेटला व तिला त्याचेशी बोलण्याचा आग्रह करु लागला त्यास फिर्यादीने नकार दिला असता त्याने फिर्यादीस शिवीगाळ करुन पेट्रोल टाकून जाळून मारीन अशी धमकी दिल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून कलम 376(2)(n), 354(ड ),323,504,506 IPC r/w 4,6,12 POCSOA r/w 3(1)(w)(i)(ii),3(1)(r)(s), 3(2)(va) atrocities अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास अधिकारी श्री गोकुळ सिंह पाटील (SDPO) पुलगाव करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here