Home Breaking News अवैध बायोडिझेल तयार करत असलेल्या कंपनी वर पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाच्या...

अवैध बायोडिझेल तयार करत असलेल्या कंपनी वर पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाच्या वतीने छापा

 

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

मलकापूर येथिल MIDC परिसरात मागील कित्येक महिन्यापासून केमिकल युक्त पदार्थ पासून बायोडिझेल तयार करण्यात येत असुन त्याची सरास पणे अवैध रित्या कुठलाही परवाना नसताना विक्री होत होती परंतु प्रशासन ने त्याबद्दल कुठलीही ठोस अशी कारवाई अद्याप पर्यंत केली न्हवती परंतु DYSP अभिनव त्यागी यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी तहसील प्रशासनाला सोबत घेऊन या अवैध डिझेल कम्पनी वर काल रात्री च्या सुमारास छापा टाकला असता इथे अवैध तयार करण्यात आलेले 60000 लिटर बायोडिझेल च्या नावावर तयार करण्यात आलेले केमिकल सापडले तिथे टँकर मध्ये या केमिकल युक्त डिझेल टँकर मध्ये भरत असतांना आढळले त्या संदर्भात त्या केमिकल युक्त डीझेल चे नमुने घेण्यात आले असुन ते पेट्रोलियम लॅब इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले व पुढील तपास मलकापूर तहसील प्रशासन करीत असल्याची माहिती DYSP अभिनव त्यागी यांनी दिली .
जिल्हा प्रशासनाने या अवैध बायोडिझेल ला आळा बसावा याकरीता मागील काही महिण्याआधी एका विशिष्ट टीमची नेमणूक केली असुन या टीमने कुठलीही ठोस अशी कारवाई केली नसल्याचे दिसुन येत आहे
परंतु या मोठ्या व धाडसी कारवाईमुळे आता अवैध डिझेल बनवणारे व विक्री वाल्यांचे धाबे दणाणले ते दिसून येत आहे