संग्रामपूर : संग्रामपूर तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांवर लादण्यात आलेल्या जाचक अटींच्या शासन निर्णयाची होळी करून संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला.sangrampurnews
ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांचा समावेश शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला नसून, त्याऐवजी ग्रामरोजगार सहाय्यकांसाठी विविध जाचक अटींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.panchayatsamiti
यामध्ये मनरेगा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनुष्य-दिवस निर्माण करण्याची जबाबदारी, ११ महिन्यांची निवड प्रक्रिया तसेच कामांच्या संदर्भाने ग्रामरोजगार सहाय्यकांना कार्यमुक्त करण्यासंदर्भातील तरतुदींचा समावेश असल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली.krushinews
Greater Noida Bus Fire: ग्रेटर नोएडा में स्लीपर बस बनी आग का गोला
ग्रामरोजगार सहाय्यक मागील अनेक वर्षांपासून मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीत ग्रामपातळीवर महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
काम करताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून लाभार्थ्यांची KYC करणे, बँक खाते व आधार अपडेट करून घेणे, तसेच विविध कामांच्या मास्टरसाठी तालुकास्तरावर वारंवार ये-जा करणे यांसारखी कामे करावी लागतात. या सर्व जबाबदाऱ्यांच्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यंत कमी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.tahsilnews
तसेच ३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानंतर जवळपास २३-२४ महिने उलटूनही ग्रामरोजगार सहाय्यकांना अपेक्षित मानधन लागू करण्यात आलेले नाही, असा दावा संघटनेने केला. प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेण्याऐवजी नवीन जाचक अटींचा शासन निर्णय काढण्यात आल्याने ग्रामरोजगार सहाय्यकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.suryamarathinews
यावेळी संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी माधवजी पायघन तसेच कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जाचक अटी तत्काळ रद्द करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांचा समावेश असलेला नवीन शासन निर्णय लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.farmernews
मागण्यांबाबत शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास दि. २ ऑक्टोबरपासून मनरेगा योजनेच्या कामावर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. महात्मा गांधी यांच्या नावाने सुरू असलेल्या मनरेगा योजनेची ग्रामपातळीवरील अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Farmernews/यावेळी तालुकाध्यक्ष राहुल मेटांगे, उपाध्यक्ष सुरज परघरमोर, सचिव गजानन बामणे यांच्यासह रोजगार सहाय्यक देविदास शिंदे, संतोष वानखडे, , यांच्यासह तालुक्यातील रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







