नगरपरिषद महिला कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेट वाटप आणि सत्कार.
(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
*आज दि. 3 जानेवारी ला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त असंघटीत कामगार काँग्रेस घुग्घूस तर्फे घुग्घूस येथील नगरपरिषद महिला गोरगरीब कर्मचाऱ्यांना ब्लँकेट वाटप करून त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन असंघटीत कामगार काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा. संदीपभाऊ सिडाम, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घूस शहर अध्यक्ष अंकेश मडावी यांनी केले. प्रमुख पाहूणे मा. डॉ. रानी किशोर बोबडे तसेच पंचशील चौक घुग्घूस येथील आर्मी मँन राजुभाऊ घागरगुंडे उपस्थित होते. घुग्घूस काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा. शेखरजी तंगळपेल्ली, मा. अनिरुद्धजी आवळे, मा. क्षितिज गोंगले आणि आमचे मित्र पंकजभाऊ धोटे उपस्थित होते.*