आम आदमी पार्टीची संपूर्ण विदर्भात दोन हजार किलोमीटर ची झाडू यात्रा- बुलढाणा येथे जनसभा

0
112

 

 

इस्माईल शेखबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जनता विशेषता विदर्भातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,विद्यार्थी यांचे ज्वलंत प्रश्न, तसेच वाढती बेरोजगारी महागाई शेती विषयक प्रश्नांवर शासनाची उदासीनता,यासारख्या अनेक विषयांवर सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करण्यासाठी त्यांची थेट भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी झाडू यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन नागरिकांची भेट घेणार आहे

. झाडू यात्रा ही  सेवाग्राम वर्धा येथे महात्मा गांधीजी यांच्या जयंतीदिनी म्हणजे 2 ऑक्टोंबर रोजी सुरू होऊन ही विदर्भातील यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यातील विविध ठिकाणावर सभां व रैली चे आयोजन केले आहे.आम आदमी पक्षाची झाडू यात्रा ही दोन ऑक्टोंबर पासून सुरु होऊन संपूर्ण विदर्भाचा दौरा करत 11 ऑक्टोबरला चंद्रपूर राजुरा येथे समापन करण्यात येत आहे. या दरम्यान सर्वसामान्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या या थेट पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येईल.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही सर्वसामान्यांना धोका देणारी आहे .सर्वसामान्यांचा या राजकारणांवर अविश्वास निर्माण झालेला आहे. एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून एकत्र येणारे हे नेते यांना जनतेचे प्रश्नांचा मात्र यांना विसर पडलेला आहे.

 

त्यांच्या याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पक्षाची झाडू यात्रा आयोजित केलेली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संपूर्ण यात्रेमध्ये आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी श्री गोपाल भाई इटालिया गुजरातच्या यशाचे शिल्पकार  पक्षाचे युवा नेतृत्व, त्याच बरोबर राज्य संघटक श्री संदीप जी देसाई ,श्री अजित फाटके, श्री मनीष दामोदर मोडक ,श्री भूषण धाकुलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे ची माहिती आज आम आदमी पक्षाचे राज्य संघटक एडवोकेट मनीष दामोदर मोडक यांनी दिली आहे

.पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पार्टीचे बुलढाणा भानुदास पावर दीपक मापारी गणेश इंगळे इरफान शेख प्रसाद घेवंदे उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here