एम.आय.एम. पार्टीच्या डफडे बजाव आंदोलनास यश

0
134

 

न.प.ने तातडीने दखल घेऊन समस्या सोडवली!

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगाव : प्रभाग क्र. १६. बिलाल मस्जीद, बड़े प्लॉट येथील बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी एम आय एम ने केलेल्या डफळे आंदोलनाची दखल घेऊन खामगाव नगरपालिकेने सदर बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू केल्याने एमआयएमच्या आंदोलनाला यश मिळाले अशी माहिती एम आय एम शहराध्यक्ष आरिफपैलवान यांनी दिली . सदर रस्त्यावरीलस्ट्रीटलाईट बंद असून चालु करण्याबाबतचे निवेदन दि. ०३/१०/२०२३ रोजी स्थानिक नगर परिषदेला दिले होते.

पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून दि. १२/१०/२०२३ रोजी न.प. समोर दि.२०/१०/२०२३ ला मागणी मान्य न झाल्यास डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज दि.२०/१०/२०२३ रोजी नगर परिषद कार्यालय समोर एम. आय. एम. चे शहर अध्यक्ष मो आरीफ अब्दुल लतीफ यांच्या नेतृत्वात डफडे बजाव आंदोलन करण्याकरीता गेले असता

, शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री शांतीकुमार पाटील साहेब यांनी न.प. मुख्याधिकारी खामगाव यांच्याशी चर्चा करून समस्या सोडविण्याबाबत कळविले असता न.प. मुख्याधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेवून स्ट्रीट लाईट सुरु करून दिली. त्यामुळे सदर आंदोलन करण्या अगोदर न.प. ने दखल घेतल्यामुळे सदर आंदोलनास यश मिळाल्यानंतर बर्डे प्लॉट भागातील नागरिकांमाध्ये तसेच एमआयएमच्या कार्यकत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

सदर आंदोलनाच्या बातम्या प्रकाशित करणाऱ्या सर्व वृत्तपत्र संपादकांचे व मा. ठाणेदार साहेब श्री शांतीकुमार पाटील साहेब, शहर पोलीस स्टेशन खामगांव यांचे आभार व्यक्त केले.

परिसरातील नागरिकांनी तसेच मो. आरिफ पहेलवान, ए. रफिक ए कय्युम, खामगाव तालुकाध्यक्ष, सलीम शाह जिल्हा सरचिटणीस, यासीन खान युवक तालुकाध्यक्ष खामगाव, शेख इम्रान शेख जलील युवा अध्यक्ष खामगाव, गालिब शाह शाखा अध्यक्ष पहुरजिरा, शेख इम्रान शेख रशीद शाखा अध्यक्ष ताज नगर, फैसल खान, शेख रिजवान, शेख इमरान शेख रशीद शाखा अध्यक्षा. आदी उपस्थित होते.#एम आय एम #MIM

 

मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ

एमआयएमआयएम शहर अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here