Home Breaking News एसटी वाहक कर्मचारी महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला . . गळा चिरून...

एसटी वाहक कर्मचारी महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला . . गळा चिरून हत्या केल्याचा संशय . अंत्री खेडेकर परिसरात खळबळ .


सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी )

– सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक जात असलेल्या व्यक्तींना दिनांक सोळा एप्रिल च्या सकाळी सकाळी अंत्री खेडेकर गावालगत काही हाकेच्या अंतरावर रोडला लागून नाल्यात एक रक्ताने माखलेला तरुणीचा मृतदेह आढळून आला . पोलिसांनी पंचनामा केला असता तरुणीचा मृतदेह हा गळा चिरलेला, हातापायावर चाकूचे वार, अंगावर चटके दिल्याचे निशाण मृतदेहावर दिसत असल्याने हा खून असल्याचे स्‍पष्ट होत आहे. त्यामूळे अंत्री खेडेकर परीसरात खळबळ उडाली आहे .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेले भिमराव रामा मोरे यांची २५ वर्षाची बुलडाणा आगाराची मुलगी माधुरी भिमराव मोरे ही गेल्या सहा ते सात वर्षा पासून एसटी महामंडळ विभागात वाहक पदावर कार्यरत होती. सुरवातीला ती जाफ्राबाद विभागाला होती आणि नुकतीच काही महिन्यापर्वी बुलढाणा एसटी आगार विभागात बदली झाली होती. सध्या ती साखळी येथे मावशी कडे राहत असे .परवा तिचे वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्‍यानुसार साखळी (ता. बुलडाणा) येथे मावशीच्‍या घरी त्‍या मुक्‍कामी होत्या. काल ड्युटी करून आज त्‍यांची आठवडी सुटी असल्याने अंत्री खेडेकरला घरी परतणार होत्‍या. मात्र थेट मृतदेहच भल्‍या पहाटे अंत्री खेडेकरच्‍या शिवारात आढळला. मृतदेह संशयास्‍पद अवस्‍थेत असल्याने खून झाल्‍याचे दिसून येत आहे. भल्‍या पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या ग्रामस्‍थांना मृतदेह दिसल्यानंतर त्‍यांनी गावात ही माहिती दिली. त्‍यानंतर पोलीस पाटलांनी अंढेरा पोलिसांना ही माहिती दिली. तातडीने ठाणेदार राजवंत आठवले यांनी पथकासह घटनास्‍थळी धाव घेतली. खून असल्याने बुलडाण्यावरून श्वानपथक व ठसेतज्‍ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पंचनामा आणि खुन्‍याचा माग काढला जात आहे. दरम्‍यान, सूत्रांच्‍या माहितीनुसार, माधुरी यांचा ५ वर्षांपूर्वी घटस्‍फोट झाला होता. यापूर्वी त्‍या जाफ्राबाद आगारात कार्यरत होत्‍या. तिथे असताना एक एसटी वाहक त्‍यांची नेहमी छेड काढायचा. त्‍याच्‍या त्रासाला कंटाळून त्‍यांनी बुलडाणा आगारात बदली करून घेतली होती, असे तिच्‍या वडिलांनी सांगितले. पोलीस या दृष्टीनेही तपास करणार आहेत. खुनापूर्वी त्‍यांच्‍यावर बलात्‍कार झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्‍याच्‍या अहवालानंतर ही बाब स्‍पष्ट होणार आहे.आणि घटनास्थळी ठाणेदार राजवंत आढवले , समाधान झिने , बिट अमलदार पोफळे ,मुन्ना राठोड , हजर होते ‘आता मुख्य आरोपीला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान असेल ‘