औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; प्रथम एडमिशन घेणाऱ्या वि्यार्थ्याचे पुषपगुच्छ देउन संस्थेच्या वतीने स्वागत!

0
96

 

नांदुरा, प्रतिनिधी

दूध डेअरी भागात असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२३- २४ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ०६ व्यावसायायिक र्कोसेससाठी १४४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी www. admission. dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज केलेले आहे त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पहिली प्रवेश फेरी २१ ते २५ जुलै २०२३ या दरम्यान घेण्यात येणार आहे.

आज दिनांक २१ जुलै रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा येथे प्रथम प्रवेश घेणारा विद्यार्थी विवेक विनोद खंडारे याचे संस्थेच्या वतीने पुषपगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले याप्रसंगी श्री. जी एस मगर, श्री. एस जी हरणे,श्री. एम झेड कादरी, पंडित मॅडम, शेख मॅडम यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अर्ज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदुरा या संस्थेमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा. संकेतस्थळावर अर्ज, प्रवेश पद्धती, नियमावली व वेळापत्रक उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य जी.एन.काळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here