कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे मा जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात पुतळा जाळून केला जाहीर निषेध.

0
351

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

 

बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ह्या घटनेबद्दल आक्षेपार्ह विधान करून जनतेच्या व तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. याचा निषेध म्हणून बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख बुलडाणा यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा येथे बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळून बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच विटंबना करण्याऱ्या दोषींवर कडक कारवाई करून बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर, पं स मा सभापती सुधाकर आघाव, मा संचालक श्रीकांत पवार, द आ उप जि प्र दादाराव महाले, वै आ ता प्र डॉ अरुण पोफळे, उप ता प्रमुख विजय इतवारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज़ साठी अनिलसिंग चव्हाण सह निलेश चिपडे बुलढाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here