खडकत व गाडीबोरी येथील अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाच्या शेताची आ. संतोषराव बांगर यांच्याकडून पाहणी.

0
229

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील खडकत व गाडीबोरी येथे काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संतोषराव बांगर यांनी स्वतः शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व पंचनामे करण्याचे तहसीलदार मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना आदेश देण्यात आले. या वेळी सोबत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरा मुंडे, शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम, दिनकरराव गंगावणे, नानाराव वडकुते, शंकर लोथे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here