सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.11.7. 2019 गुन्हे प्रकटीकरण पथक हवा बनसोड पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना खात्रीशीर माहिती मिळाली की दि.10 जुलै सायंकाळच्या दरम्यान अंकुश मेश्राम राहणार महात्मा फुले वार्ड हिंगणघाट हा मोटर सायकल ने गांजा घेऊन हिंगणघाट शहरात येत आहे अशा माहितीवरून श्री दिनेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक श्री संपत चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत पाटणकर व पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल लगड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा विवेक बनसोड व त्यांचे पथकासह कलोडे चौक हिंगणघाट येथे नाकेबंदी केली असता अंकुश अरुण मेश्राम वय 28 वर्ष राहणार महात्मा फुले वार्ड हिंगणघाट हा मोटरसायकलने वाहतूक करीत असताना मिळून आला त्याच्या ताब्यातून एका पिवळ्या रंगाची पिशवी मध्ये 557 ग्रॅम गांजा किंमत 5570 रुपये 1 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक MH32 एम एम 8762 1 विवो कंपनीचा मोबाईल नगदी 950 रुपये असा एकूण 62520 रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर कार्यवाही दरम्यान जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 586/2021 कलम 20 (ब) एन डी .पी. एस ॲक्ट सह कलम 3()1, 181, 130 / 177 मोवाका अन्वय गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि श्री प्रशांत पाटणकर करीत आहे सदर कारवाई पोउनि अमोल लगड पोहवा विवेक बनसोड ,पंकज घोडे ,सुहास चांदोरे,प्रशांत वानखेडे ,उमेश बेले, वीरेंद्र कांबळे, संदीप बदकी ,विजय काळे यांनी केली आहे