गारपीटग्रस्त भागाची जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी नुकसान झालेल्या गहू कांदा हरभरा पिकाची पाहणी गहू हरभरा मका पिकासाठी हेक्टरी 59 हजार रुपये तर फळबाग कांदा नेट साठी 1 लाख रुपये तातडीची मदत द्या राका जिल्हाध्यक्ष ऍडवोकेट काझी यांची मागणी

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्यात दिनांक 19 व 20 रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 18 हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नुकसान ग्रस्त सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, झोटींगा देऊळगाव कोळ, डोरव्ही आदी भागातील अवकाळी पा ऊस गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी राका जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांनी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसू बघितले क्षणात होत्याच नव्हते झाल्याने शेतकऱ्यांता च्या हातातोंडाशीी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने गहू हरभरा नका या पिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये तर फळबाग कांदा पिकासाठी 1 लाख रुपये तसेच नेट शेड साठी 1 लाख रुपये तातडीची मदत करावी अशी मागणी एडवोकेट नाझेर काझी यांनी केली असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांना सांगणार असल्याचे सांगितले
जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शेतात उभे असलेले हरभरा गहू मका चे पीक कांदा पिक अक्षरशा झोपली फळबाग पीक आंबा मोहर गळून गेला नेट शेड उध्वस्त झाले प्रचंड नुकसान झाले आतील पिकाचे प्रचंड नुकसान झाले टरबूज काकडी टोमॅटो मिरची आदी चे पिक या अवकाळी पावसाचा गाराचा मार लागल्याने खराब झाली गळून पडली आहे सिंदखेड राजा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकेल असा अंदाज आहे आज एडवोकेट नाझेर काझी यांनी मलकापूर पांग्रा देऊळगाव कोळ डोरली आदी भागातील शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतातील नुकसान पाहून तेथील परिस्थितीचा अंदाज आला शेतकऱ्यांनी झालेल्या गारपीट च आणि अवकाळी
आपबीती सांगितल्याने सर्वांच्या डोळ्यात आसवे आली त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मदत करावी त्यानंतर सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसानी संपूर्ण मदत द्यावी अशी मागणी एडवोकेट नाझेर काझी यांनी केली यावेळी पाहणी करताना त्यांच्यासोबत राका तालुकाध्यक्ष शिवाजी राजे देशमुख राका विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदीप मेहेत्रे पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांचे स्वीय संभाजी पेटकर सरपंच भगवानराव उगले माजी सरपंच अहमद यारखा आदर्श कास्तकार बंडू उगले देऊळगाव कोळ सरपंच राजू गायकवाड संजय गायकवाड उद्धव गायकवाड डोरव्ही सरपंच बाळू पवार उपसरपंच मुरकुट माजी सरपंच उद्धव शेळके वसंत मुरकुट तुकाराम पंखुले रत्नाकर पंखुले दिनकर सोळंके गजानन शेळके प्रकाश मुरकुट अनिल मुरकुटे गणेश मुरकुटे अमोल साळवे आदी उपस्थित होते.

Leave a Comment