Home Breaking News घुग्घुस भाजपातर्फे पेट्रोल व डिझेल भाववाढ कमी करण्यासाठी निषेध आंदोलन

घुग्घुस भाजपातर्फे पेट्रोल व डिझेल भाववाढ कमी करण्यासाठी निषेध आंदोलन

0
260

 

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शुक्रवार 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता येथील गांधी चौकात घुग्घुस भाजपातर्फे महाराष्ट्र राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा त्याकरिता भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्व संध्येला पेट्रोल वरील एक्साईज कर पाच रुपये प्रती लिटर तर डिझेल वरील एक्साईज कर दहा रुपये प्रति लिटर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल व डिझेल वरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे अशी भाजपाची मागणी आहे. राज्यात डिझेल वर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोल वर २५ टक्के व्हॅट आकारला जातो त्या खेरीज पेट्रोल वर प्रती लिटर सेसचा समावेश आहे.राज्य सरकारला पेट्रोल व डिझेल वर करापोटी तिस ते चाळीस रुपये मिळतात.
याप्रसंगी आंदोलनाचे नेतृत्व करणारे वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझल व पेट्रोलचे दर कमी केले परंतु महाराष्ट्र सरकार आपला व्हॅट कमी करीत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रात डिझेल व पेट्रोल चे भाव कमी झाले नाही व त्यांनी महाराष्ट्र सरकार विरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला.
ठाकरे सरकार मुर्दाबाद महाविकास आघाडीचा निषेध असो अशी प्रचंड घोषणाबाजी व नारेबाजी करण्यात आली व घुग्घुस पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी चंद्रपूर भाजपा जिल्हामहामंत्री नामदेव डाहुले माजी जिप सभापती महिला व बालकल्याण सौ. नितुताई चौधरी, रणजित सोयाम जिप सदस्य विजय आग्रे तालुका महामंत्री वाहतूक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी, विकास जुमनाके उपसभापती पं. स. चंद्रपूर विनोद खेवले भाजयुमो महामंत्री तालुका चंद्रपूर, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी सरपंच संतोष नुने, उपसरपंच मंगेश राजगडकर, पारस पिंपलकर माजी सरपंच सुभाष पिंपळशेंडे आशिष वाढई भाजपा युवानेते कमलाकर येरमे माजी सरपंच देवाडा, विनोद चाफले, ऋषी कोवे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, साजन गोहने प्रकाश अलवलवार सरपंच वेंढली, सुनील राम, संजय भोंगळे, रत्नेश सिंग, सुरेंद्र जोगी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here