Home चंद्रपूर घुग्घूस कॉ.न.२ बैरम बाबा देवस्थानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा : राजु रेड्डी

घुग्घूस कॉ.न.२ बैरम बाबा देवस्थानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा : राजु रेड्डी

386

 

काँग्रेसची (Wcl) वेकोली प्रशासनाला मागणी

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : शहराचे आराध्य कुल दैवत बैरम बाबा यांचे देवस्थान कॉलरी नंबर 2 येथे असून याठिकाणी जिल्ह्या भरातून भाविक – भक्त दर्शनासाठी येतात
नवस फेडतात व स्वयंपाक करतात.
मात्र याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागतो.
याठिकाणी वेकोलीच्या सि.एच.पी येथून एक पाईप लाईनच्या माध्यमातून नळ घेण्यात आले होते.
मात्र सदर कनेक्शन तुटल्याने हे नळ बंद झाले असून सदर पाईपलाईन तातळीने दुरुस्त करून नळ चालू करावे अशी वेकोली सब एरिया फुल्लारे यांना निवेदनातुन काँग्रेस तर्फे मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिष्टमंडळात शहर अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,रोहित डाकूर,विशाल मादर,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी,बालकिशन कुळसंगे,अंकुश सपाटे,सचिन कोंडावार,सुनील पाटील,आरिफ शेख,रफिक शेख,रंजित राखुंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.