Home Breaking News चंद्रपूर काँग्रेस पर्यावरण तालुका अध्यक्षपदी महेश किन्नाके यांची नियुक्ती

चंद्रपूर काँग्रेस पर्यावरण तालुका अध्यक्षपदी महेश किन्नाके यांची नियुक्ती

 

काँग्रेस पर्यावरण विभाग तळमळीने कार्य करेल :शहर अध्यक्ष राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अंतर्गत कार्यरत काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर काँग्रेस कमेटी तर्फे जनसंपर्क कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

चंद्रपूर तालुक्यात प्रदूषणाची गंभीर समस्या असून पर्यावरण संवर्धनासाठी काँग्रेस पर्यावरण विभाग तळमळीने कार्य करेल असा आशावाद शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी व्यक्त केला