जातेगांव ग्रामपंचायत सरपंचपदी शांता चांगदेव पवार तर उपसरपंचपदी पंढरीनाथ काशिनाथ वर्पे

0
734

 

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे दि. २५ रोजी सरपंचपदाची निवड प्रक्रिया पार पडली.यात सरपंचपदी शांता चांगदेव पवार तर उपसरपंचपदी पंढरीनाथ काशिनाथ वर्पे यांची नियुक्ती करण्यात आली.
नांदगाव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकासाठी १५ जानेवारी निवडणूक घेण्यात आली होती.या निकालानंतर सरपंच सोडत जाहीर करण्यात आली होती. आरक्षणा बाबत बोलठाण येथील रिपीटीशन दाखल झाल्यानंतर १६ फेब्रुवारीपर्यंत सरपंच पदासाठी स्थगिती देण्यात आली होती.त्यानंतर सरपंच पद निवडीसाठी २५ व २६ फेब्रुवारी हे दोन दिवस निश्चित करण्यात आले होते.दिनांक २५ रोजी तालूक्यातील ३९ गावांची निवड प्रक्रिया झाली.तालुक्यातील घाटमाथ्यावरील प्रमुख समजल्याजाणार्‍या जातेगांव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी दोन गटांतील दोन सदस्यांनी आपला सरपंच पदाचा अर्ज दाखल केला होता.तर दोन सदस्यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता.या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन पॅनलच्या शांता पवार यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी पंढरीनाथ वर्पे यांची नियुक्ती झाली.निवडणूक निर्णय अधिकारी आर.जे.चोळके , किशोर अहिरे व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हि प्रक्रिया पार पडली.परिवर्तन पॅनलकडून नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस निरीक्षक अनिल कातकडे, पंकज देवकाते, कांदाळकर,अनिल गांगुर्डे यांच्यासह पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here