Home Breaking News सुनगाव येथे रोजगार सेवकांचा मनमानी कारभार एमआरजीएस अंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना काहीही...

सुनगाव येथे रोजगार सेवकांचा मनमानी कारभार एमआरजीएस अंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना काहीही करून घ्या अशी धमकी

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या एमआरजीएस कामामध्ये घरकुल लाभार्थी वृक्ष लागवड वृक्ष संगोपन इत्यादी कामे केली जातात या कामासाठी पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत सूनगाव येथे अनिल कोथळकर रोजगासेवक नियुक्त आहे परंतु रोजगार सेवक हा अनेक लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहेत व कामाबाबत होणारे मस्टर काढण्यास विलंब करत आहे व सदर लाभार्थ्यांना घरकुल संबंधित व वृक्षलागवड संबंधित असलेल्या मजुरांचे आधार कार्ड पेंडिंग ठेवत आहे आहेत व त्याबाबत मस्टर काढण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत दिरंगाई करत आहे व मजुरांना काहीही करून घ्या अशा प्रकारची धमकी देत आहे तरी या बाबतची तक्रार ग्रामपंचायत ला एमआरजीएस अंतर्गत कामे करणाऱ्या महिला मजुरांनी दिलेली आहे या तक्रारीवर शारदा बोबडे विमल शेषराव धुळे यमुना कातोरे द्रौपदी गजानन ढगे या महिला मजुरांच्या सह्या आहे या तक्रारीची दखल घेऊन ग्रामपंचायत व पंचायत समिती जळगाव जामोद येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी