Home Breaking News जीर्ण झालेल्या बाभळीच्या झाडाची फांदी रस्त्यावर तुटून पडली !सुदैवाने मोठी दुर्घटना टळली...

जीर्ण झालेल्या बाभळीच्या झाडाची फांदी रस्त्यावर तुटून पडली !सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

लव्हाळा ते साखरखेर्डा रस्त्यावरील
रस्त्यालगत असलेल्या जीर्ण झालेल्या एका मोठ्या बाभळीच्या झाडावरील ‘ बाभळीची फांदी रस्त्यावर पडली ‘त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना होता होता वाचली ‘साखरखेर्डा ते लव्हाळा हा रस्ता नेहमीच वर्दळीचा आहे या रस्त्याने खामगाव -मेहकर – अमडापूर – चिखली – मार्गे अनेक प्रवासी प्रवास करत असतात .तसेच शुक्रवारी हा साखरखेर्डा येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे नेहमीच दुचाकीस्वारांची या रस्त्याने ये-जा असते ‘दिनांक 12 मार्च रोजी दुपारी एक ते दीड च्या दरम्यान .मोठ्या बाबळीच्या झाडावरील फांदीतून तुटून खाली पडली .सुदैवाने कुठलेही प्रकारचे वाहन त्या दरम्यान गेले नाही ‘अन्यथा दुर्घटना घडली असती ‘म्हणून रस्त्यालगत जीर्ण झालेल्या मोठ्या बाभळीचे झाडे तोडून टाकण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली आहे ‘अन्यथा अनेक दुर्घटना घडल्यास वेळ लागणार नाही ‘