Home Breaking News जेहुर पांधी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु न केल्यास, प्रहार शेतकरी संघटना...

जेहुर पांधी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु न केल्यास, प्रहार शेतकरी संघटना करणार आमरण उपोषण

 

प्रतिनिधी -सचिन पगारे
नांदगांव नाशिक

जातेगांव येथील जेहुर पांधी रस्ता मागील पावसाळ्यात खुपच खराब होऊन शेतकऱ्यांचे येण्याजाण्याचे खुपच हाल झाले होते व शेतकऱ्यांना आपला शेतमाल गावापर्यंत विकण्यास आणता येत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले होते , तसे गट विकास अधिकारी पं.स.नांदगाव यांना निवेदन देऊन कळवीले होते आणि गट विकास आधीकारी पं.स.नांदगाव यांनी 20ऑक्टोबर 2020रोजी जातेगाव येथील जेहुर पांधी रस्त्याचे काम म.गांधी राष्ट्रीय ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत सन.2021-22 मधील क्रुती आराखड्यात सामावेश करण्याबाबत लेखी आस्वासन दीले होते.
परंतु अजुनही सदर रस्त्याचे काम सुरु झालेले नाही.म्हणुन सदर जेहुर पांधी रसत्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अण्यथा प्रहार शेतकरी संघटना व शेतकरी 25/3/2021 रोजी आमरण उपोषन करतील असे निवेदन दि.15/3/2021 रोजी गट विकास आधीकारी पं.स.नांदगाव व जातेगाव ग्राम पंचायत यांना देण्यात आले.या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सुर्यवंशी, चंद्रकांत झोडगे, जय भागवत,रवी भागवत ईश्वर जाधव आदी उपस्थित होते