Home Breaking News ShegaonNews/शेगाव बसस्थानकात मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून तीन महिला, चिमुकला जखमी

ShegaonNews/शेगाव बसस्थानकात मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून तीन महिला, चिमुकला जखमी

2

शेगाव बसस्थानकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; स्लॅब कोसळून चौघे जखमी

शेगाव बस स्थानकात बसची प्रतीक्षा करणाऱ्या तीन महिला आणि तीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर अचानक छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना शेगाव बस स्थानकावर घडल्याने एकच धांदल उडाली.

या घटनेत चौघेही जखमी झाले असून त्यांना सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णाल उपचार हे दाखल करण्यात आले आहे.

कोमल गणेश बावस्कर रेखा रामदास बावस्कर तीन वर्षे रुद्र गणेश बावस्कर व विमलाबाई भिकाजी पवार हे शेगाव बस स्थानकावरून प्रवासाकरता आले होते.

बसची प्रतीक्षा करीत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि छताचे प्लास्टर त्यांच्या अंगावर कोसळले त्यामुळे बस स्थानकात एकच खळबळ उडाली.

एकंदरीत शेगाव बस स्थानकाच्या इमारतीची अवस्था चिरणे झाली असून यापूर्वी तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला होता छताचे प्लास्टर थेट प्रवासाचे अंगावर कोसळल्याने बस स्थानकातील प्रवासांच्या सुरक्षितता प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

ShegaonNews/बस स्थानकाच्या इमारतीची तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासांकडून होत आहे.