Home Breaking News ट्रकवर भरधाव येणारी कार आदळून महिला ठार; जखमींना रुग्णालयात केले दाखल, अमरावतीमधील...

ट्रकवर भरधाव येणारी कार आदळून महिला ठार; जखमींना रुग्णालयात केले दाखल, अमरावतीमधील घटना

 

अचलपुर (अशोक वस्तानी )

ट्रकवरविरुद्ध दिशेने भरधाव येणारी कार आदळल्याने एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना अंजनगांव तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या पांढरी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ बुधवारी दुपारी दीड वाजतादरम्यान घडली. जखमींला रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी येथील एम.एच.२७ बीव्ही २०१२ क्रमांकाच्या कारने समाजसेवक प्रमोद निपाने आणि अंगणवाडी सेविका ललिता चव्हाण हे जात होते. पांढरी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ वळण रस्त्यावर अचानक ट्रकमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. यात ललिता चव्हाण या जागीच ठार झाल्या, तर प्रमोद निपाणे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.