डाॕ.आत्मारामजी मोहन जवादे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्राचे उद्घाटन संपन्न

0
279

 

 

हिँगणघाट
डाॕ.बी.आरआंबेडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष डाॕ. आत्माराम मोहनजी जवादे यांच्या नव्वदाव्या जंयती निमित्ताने डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयात डाॕ.आत्माराम मोहनजी जवादे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन संस्थेचे सचीव अनिलभाऊ जवादे यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रशांतभाऊ जवादे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांची उपस्थिती होती . उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम आपले ध्येय ठरवूनच मार्गक्रमण केले पाहिजे.आपला सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे आपली झोप.म्हणून झोप कमी करा आणि भरपूर वाचन करा.यशस्वी लोकांचे विचार एका.उद्या काय करायचे ते आजच ठरवून ते वेळीच पूर्ण करा.अपयशाने खचून जाऊ नका.
सकारात्मक विचार करून नकारात्मकतेला तिलांजली द्या.हाच खरा यशाचा मुलमंत्र आहे असे विचार व्यक्त करून अनेक यशस्वी व्यक्तीँचे उदाहरणे विद्यार्थ्यांना दिले. संस्था सचीव अनिल जवादे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा आहे.परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्पर्धा परीक्षेचे वर्ग लावता येत नाही.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही .अशा विद्यार्थ्यांच्या योग्य मार्गदर्शनाची सोय व्हावी यासाठी डाॕ.आत्मारामजी मोहन जवादे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली असे ते म्हणाले.या मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षांविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मोफत मिळणार असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्या़ंनी विद्यार्थ्यांना यावेळी केले. प्राचार्य एस.एम.राऊत,संस्था सहसचीव अनुराधा जवादे ,संस्था कोषाध्यक्ष श्री.जी.एस.भगत , संचालक श्री.बी.एस.पाटील ,मुख्याध्यापकदिलीप देवतळे यांनीही आपल्या छोटेखानी भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांतभाऊ जवादे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.यावेळी विचारमंचावर
संस्थेच्या उपाध्यक्षा मंदाकिनी जवादे,संस्थेचे संचालक चंद्रकांत नगराळे,जूही जवादे,पराग जवादे,अपुर्वा जवादे,प्रीयंका जवादे ,प्रायमरीचे मुख्याध्यापक दिलीप देवतळे ,उपप्राचार्य एच.पी.गुडदे यांची उपस्थिती होती.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमाने आपले करीअर करू पाहणाऱ्या गौरी वाडकर या युवतीनेही आपले विचार व्यक्त केले.संस्था संचालक डाॕ.चंद्रकांत नगराळे यांनी डाॕ.आत्मारमोहनजी जवादे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे संचालन गजानन भोँग यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.प्रशांत भटकर यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here