डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे 5 जून जागतीक पर्यावरण दिनाचे आवचित्त साधत मोहराळे गावात स्मशान भूमी परिसराची साफ सफाई करत केले वृक्षारोपण .

 

तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे आवचित्त साधत डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय च्या वतीने मोहराळे गावातील स्मशान भूमी परिसर ची साफ सफाई करून वृक्षारोपण करण्यात आली यात गावातील तरुणांनी स्वयं स्फुर्ती ने श्रमदान करत स्मशान भूमीत काटेरी झुडपे कचरा यांची साफ सफाई करत त्या परिसरात वड , पिंपड , कडुनिंब , बाभूळ , फुल झाडे, बांबू ,निलगिरी या प्रजातीचे वृक्ष लागवड करत आपले योगदान दिले . या प्रसंगी श्रमदान करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय
आज 5 जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मोहराळे तर्फे वृक्षारोपण लागवड करण्यात आले
कोरोना सारख्या गंभीर प्रदुर्भाव मुळे खूप लोकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेत. म्हणून पर्यावरण दिना निमित्त तुम्ही पण वृक्षारोपण करा आणि निसर्गाला सहकार्य करा. असा संदेश वाचनालय तर्फे देण्यात आला,
या आधी सुद्धा वाचनालय तर्फे वृक्षारोपण करण्यात आले होते. या प्रसंगी राहुल ऊर्फ देवा अडकमोल, सुनील सोनवणे, संदीप झाल्टे, किरण सोनवणे, अभिषेक अडकमोल, दिपक अडकमोल, अजय अडकमोल, शुभम अडकमोल, सुमित सोनवणे, उपस्थित होते
आदी ग्रामस्थांनी श्रमदान व वृक्षारोपण रोपण करून 5 जून पर्यावरण दिन केला साजरा .

Leave a Comment