हिंगणघाट: आज तान्हा पोळा निमित्त डॉ. मुजुमदार वार्ड किसान जीन जवळ भव्य दिव्य असा बालगोपालाचा उत्साह पहावयास मिळाला मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व लोकांना घराबाहेर निघण्यास मनाई होती. त्यामुळे सर्व सणावर पाणी फेरल्या गेले परंतु यावर्षी कोरोना पासून सुटका झाली. त्यामुळे सर्व सण साजरे करण्यात येत आहे. सणामधील सण म्हणजे पोळा तीन दिवसाच्या ह्या सणाला पहिल्या दिवशी मातीच्या बैलाची पूजा करून “आज आवतन घ्या उद्या जेवायला या” असे आमंत्रण देऊन दुसऱ्या दिवशी मोठ्या बैलांना पुरणाची पोळी असा नैवेद्य भरवायची प्रथा आहे व तिसऱ्या दिवशी लाकडी बैल म्हणजे छोटा पोळा छोटे बाल गोपाल आप आपल्या नंदीबैलांना सजवून वार्डातील चौकामध्ये जमा होऊन उत्साहात बक्षीस घेऊन आपापल्या घरी जातात अशा या सणाला डॉ. मुजुमदार वार्ड मध्ये प्रमोद जुमडे,पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीत बिस्किट वाटप, बक्षीसे वाटप, व बोजारा देऊन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देवरावजी साबळे, गोलू राऊत, विलास निमगडे, अंकुश मासरे, निस्तेर नर्चाल, बालू भाऊ जगनाते, अनिल भाऊ बावणे, मनोज कांबळे, अनुराग जुमडे व वार्डातील उत्साही जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.