Home Breaking News निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

0
1133

 

SURYA MARATHI NEWS

नालासोपारा : विरारच्या कारगिलनगरमधील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय नवविवाहितेचा निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याने संपूर्ण विरार परिसरात खळबळ उडाली आहे. व या महिलेच्या हाताची नस कापलेली आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास करत आहे.
विरारच्या कारगिलनगरमधील जय तुळजा भवानी संकुल बिल्डिंग नंबर ६ मध्ये राहणाऱ्या प्रिया कांबळे (२८) या महिलेचा हाताची नस कापलेल्या अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडला आहे. तिचा पती हा शुक्रवारी रात्रपाळीला कामावर गेला होता. शनिवारी सकाळी कामावरून घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व या महिलेचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. व तिच्या पतीने विरार पोलिसांना घडलेल्या घटनेची सम्पूर्ण माहिती दिली आहे. Surya marathi news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here