नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
नांदुरा तालुक्यातील गावांमध्ये काल झालेल्या अवकाळी पाऊसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या घासाचे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे.
मुरंबा व बरफगाव शिवारात मका, हरभरा, कांदा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर वसाळी, वळती बु. व खु. या शिवारात मध्ये केळी, ऊस, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे
या नुकसानाचे संबंधित कृषी अधिकारी, तलाठी यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देवून माझ्या माय बाप शेतकऱ्यांना सहकार्य करावे ही विनंती.
तर पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशी मागणी ही तालुक्यातील शेतकरी करीत आहे.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



