प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत १ रुपयात काढण्यात आलेल्या पीक विम्याने केली शेतकऱ्यांची फसवणूक ?

 

परिवर्तन जनसंवाद यात्रे दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अतुल वांदिले यांच्या कडे मांडली समस्या…

वर्धा जिल्हयात अडीच लांखा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी काढला पीक विमा…

राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून १३ दिवसात ११३ गावांना दिली भेट …

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसवांद यात्रा काढली असून या यात्रेने १३ दिवसात १३ गावांना भेटी दिल्या.

परिवर्तन यात्रे दरम्यान शेतकऱ्याचा भेटी घेत असताना शेतकऱ्यांची मूळ समस्या लक्षात आली ती म्हणजे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत एक रुपया मध्ये पीक विमा काढला असून त्यांचा लाभ अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्याशी संवाद साधत त्यांची समस्या जाणून घेतली.

परिवर्तन जनसंवाद यात्रा मागील तेरा दिवसामध्ये पोहणा, शेकापूर(बाई), पिपरी, वडणेर, बुरकोनी, फुकटा, वाघोली, आजंती,सावली, नांदगाव, नंदोरी, सावंगी झाडे, समुद्रपूर सर्कल मधील एकशे तेरा गावामध्ये भेटी झाल्या असून मुख्यत्वे शेतकरी,मजूरवर्ग ,युवावर्ग याच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा संकल्प या यात्रेतून होत आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयामध्ये पीक विमा काढला आहे.जिल्ह्यात एकूण अडीच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.

परंतु त्या पीक विमाचा लाभ आता पर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसून अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित असून शेतकरी सरकार बाबत रोष व्यक्त करत आहे.

शेतकऱ्यांच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी कुणी तरी आपल्यापर्यत येत आहे ,आपल्या घरपर्यत पोहचत आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असून गावोगावी मोठया उत्साहाने ,आनंदाने परिवर्तन यात्रेचे स्वागत करताना दिसून येत असून शेकडो शेतकरी स्वंयप्रेरणेने उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी होत आहे

Leave a Comment