इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
पोलीस स्टेशन शेगाव शहर येथील परी पोलीस उपाधीक्षक श्री.विवेक पाटील व पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील यांनी महत्त्वाच्या अशा बकरी ईद व आषाढी एकादशी बंदोबस्त दरम्यान शेगाव येथील मुख्य जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजबांधवांची नमाज अदा झाल्यानंतर त्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. त्यांना पुष्पगुच्छ देऊन बकरी इदच्या शुभकामना दिल्या.
बंदोबस्त करिता आलेले अधिकारी व अंमलदार यांना बकरी ईद बंदोबस्त शांततेत पार पडल्याबद्दल अभिनंदन करून बंदोबस्त काळात मुस्लिम समाजवासीयांनी पोलिसांना केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले व एकादशी आषाढी बंदोबस्ता करिता रवाना झाले.





![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=218%2C150&ssl=1)


