1 नोव्हेंबर दुपार दरम्यान बस स्टॅन्ड हिंगणघाट येथे एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याचे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपघात क्रमांक 1017/ 2021 कलम 379 भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला सदरची माहिती पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांनी पोलीस हवालदार शेखर डोंगरे यांचे डीपी पथकाला गुन्हा उघड करण्यातबाबतच्या सूचना दिल्या माहिती मिळताच लागलीच पोलीस हवालदार शेखर डोंगरे व त्यांच्या पथकांनी आपल्या नेटवर्कचा फायदा व माहिती घेत सदर गुन्ह्यातील आरोपी श्रीमती सरलाबाई दौलतराव राखडे राहणार अशोक नगर वार्ड क्रमांक 28 वर्धा तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील बस स्टैंड मधून एक महिलेची सोन्याचे मंगळसूत्र चोरल्या बाबत ची कबुली दिल्याने तिच्याकडून दागिने जप्त करून सदरचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडीस करण्यात आला सदर ची कामगिरी मा.श्री प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक वर्धा मा. श्री यशवंत सोळंके अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा मा.श्री धनी दिनेश कदम उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट पोलिस निरीक्षक श्री संपत चव्हाण पोलीस स्टेशन हिगणघाट यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस हवालदार शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले ,सचिन भारशंकर राहुल साठे, प्रतिभा दुधबळे यांनी केली आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा