गजानन सोनटक्के जळगाव जा
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथे 18 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. जाणून घेऊया नेमका काय आहे प्रकार….
एकलारा बानोदा ता.संग्रामपुर सिद्धार्थ सुभाष परघरमोर (वय 26) याने 7083482601 या मोबाईल वरून ‘डायल 112’ या पोलिसांच्या इमर्जन्सी नंबरवर कॉल करून त्याचा भाऊ अनिल परघरमोर याचा मुलगा आरुष (वय दीड महिना) यास या गावातील त्याचे नातेवाईक माणिकराव नारायण तायडे यांनी किडनॅप केली अशी माहिती दिली. यावरून पोलिसांनी एक्लारा येथे जाऊन या प्रकरणाची शहानिशा केली असता असा कोणताही प्रकार झालेला नाही असे समजले तसेच मुलगा हा त्याची आई सौ कमल अनिल परघरमोर यांच्याकडे सुरक्षित आढळून आला .सिध्दार्थ याने डायरेक्शन 112 वर कॉल करून मुलगा किडनॅप झाल्याबद्दल पोलिसांना खोटी माहिती पुरवून दिशाभूल केली.या प्रकरणात तामगाव पोलिस स्टेशन मध्ये पोकॉ अशोक शुभाष वावगे यांनी फिर्याद दिली. या वरुन १९ डिसेंबर रोजी या प्रकरणात 182,177 भादवीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे.







