भुसावळ येथील अप्पर डी आर एम यांनी शेगाव रेल्वे स्थानकावर दिली भेट केले निरीक्षण.

0
831

 

शेगाव: मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनचे अप्पर डीआरएम रूकमैया मीना यांनी प्रथमच शेगाव रेल्वेस्थानकावर 15 डिसेंबर रोजी भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी शेजारी रेल्वेस्थानक परिसराचे निरीक्षण केले. राजस्थान राज्यातील जिल्हा मध्ये येणाऱ्या कास पुरिया तालुका उनियारा येथील शेतकऱ्यांचे सुपुत्र असलेले ए डी आर एम रूकमैया मीना यांनी भुसावळ येथे टीडीआरचे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शेगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली सर्वप्रथम त्यांचे शेगाव रेल्वे स्थानकाचे प्रबंधक स्टेशन मास्तर प्रकाश पुंडकर सर, मोहन देशपांडे आर पी एफ चे डॉक्टर विजय साळवे जसं रेल्वे विभागाचे शेगाव रेल्वे स्थानकावरील सर्व विभाग प्रमुख यांनी त्यांचे स्वागत केले. रेल्वे मीना यांनी तुला रे चालू आहे शेगाव रेल्वे स्थानकावरील स्वच्छता पाहून आनंद व्यक्त केला तसेच शेगाव रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना योग्य अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व शेगाव रेल्वे प्रबंधक पुंडकर यांच्यासह सर्व इतरांचे कौतुक केले. एडीआरएम मीना यांनी शेगाव रेल्वे स्थानकावरील कार्यरत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या रेल्वे विभागाच्या शेगाव येथील रुग्णालयाला सुद्धा त्यांनी यावेळी भेट दिली यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी रेल्वे कर्मचार्‍यांच्या आरोग्य तपासणी, इमर्जन्सी उपचारासाठी प्राथमिक उपचारासाठी, आवश्यक ते यंत्र सामग्री आणि औषधी बाबत चर्चा केली. राजस्थान राज्यातील असलेले तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेले ए. डी .आर .एम. रुक मैया मीना यांना उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल 2010 मध्ये राष्ट्रपती अवार्ड रेल्वे विभागाचे तेरा करोड रुपयांची बचत केल्याबद्दल सन 2015 मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी उत्तर मध्य रेल्वेच्या मुख्यालय असलेल्या प्रयागराज येथे जनरल चीफ इंजिनियर, ऊर्जा या पदावर सुद्धा कार्य केले 2019 मध्ये प्रयाग्रज कुंभमेळा मध्ये त्यांनी सर्व समाजाच्या भाविकांना भोजनाची व्यवस्था तसेच निवाऱ्याची व्यवस्था केली होती कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी मजूर, गरीब इत्यादी कुटुंबातील सदस्यांना भोजनाची तसेच कोरोना पासून बचाव करण्याच्या उद्देशाने त्यांनी आवश्यक ती सर्व सहायता उपलब्ध करून दिली होती. शेगाव रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा व्यवस्था आणि स्वच्छता आधी कार्य बघून त्यांनी शेगाव येथे कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले. यावेळी शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक स्टेशन मास्तर पुंडकर साहेब, मोहन देशपांडे आर पी एफ चे डॉक्टर विजय साळवे यांच्यासह इतर सर्व रेल्वेचे कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here