यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथील युवा कार्यकर्ते संजय नन्नवरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चोपडा रावेर च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विनय भोईटे यांच्या हस्ते व जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅड जमील देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल येथील मनसेचे निष्ठावान युवा कार्यकर्ते संजय तोताराम नन्नवरे यांच्या कार्याची दखल घेत पक्षासाठी चोपडा रावेर या लोकसभा क्षेत्रात प्रचार प्रसार व संघटन बांधणीसाठी मोठी जबाबदारी म्हणुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने चोपडा रावेर या विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . संजय नन्नवरे यांच्या या निवडीचे संपर्क प्रमुख विनय भोईटे, जिल्हाध्यक्ष अॅड जमील देशपांडे , चोपडा यावल विधानसभा क्षेत्राचे जिल्हा अध्यक्ष कमलाकर घारू, तालुका अध्यक्ष जुगल पाटील , आकाश चोपडे आदींनी स्वागत केले आहे .







