Home बुलढाणा यावल तहसील कार्यालयात पोलीस पाटीलासह दोन दारूड्यांचा दांगडो शांततेचा भंग पोलीसात गुन्हा...

यावल तहसील कार्यालयात पोलीस पाटीलासह दोन दारूड्यांचा दांगडो शांततेचा भंग पोलीसात गुन्हा दाखल. . .

 

, . यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

,येथील तहसील कार्यालयात पोलीस पाटीलासह दोन दारूड्यांचा दारूच्या नशेत दांगडो या दोघांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की दिनांक १५ मार्च रोजी यावल येथील तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनात अकलुुद तालुका यावल येथील कार्यरत असलेले पोलीस पाटील किरण मधुकर वानखेडे वय४४ वर्ष आणी दिपक विश्वनाथ झाल्टे वय४९ वर्ष राहणार अकलुद तालुका यावल यांनी दुपारी १२ , ५० वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत आरडाओरड करीत तहसील कार्यालयात शांततेचा भंग करीत असल्याची माहीती तहसीलदार महेश पवार यांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना भ्रमणव्दारे सदरची माहीती कळविली असता पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ शासकीय वाहनाने तहसील कार्यालय पाठवले व या दोघ तळीरामांना बेधुन्द अवस्थेत ताब्यात घेतले , या घटने बाबतची माहीती सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी यांनी दिल्याने पोलीसांनी पोलीस पाटीलासह दोघांविरूद्ध शांततेचा भंग महाराष्ट्र प्रोव्हीशनल अँक्ट८५ (१ ) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम११७ , ११२प्रमाणे गुन्हा दाखल केला आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी , पोलीस कर्मचारी निलेश कैलास वाघ, रोहील देवीदास गणेश हे करीत आहे .