यावल प्रतिनिधी विकी वानखेडे
यावल येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आज दि.१ जानेवारी २०२२ शनिवार रोजी दुपारी पोलिस पाटील संघटनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन यांच्या अध्यक्षस्थेखाली पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अजीज शेख व आदी पोलीस बांधव तसेच तालुक्यातील पोलीस पाटील महीला पोलीस पाटील व पत्रकारांच्या उपस्थित ही पोलीस पाटील संघटनेच्या नुतन कार्य कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पोलीस पाटील संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी पुनश्च फेरनिवड अशोक पाटील ( गिरडगाव ता यावल ) यांची तर तालुका उपाध्यक्षपदी म्हैसवाडीच्या पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी सुरेश खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीचे सुत्रसंचालन सुरेश खैरनार यांनी केले तर उपस्थितांचे परिचय ज्ञानेश्वर महाजन यांनी करून दिले.
या बैठकीत पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, प्रभाकर सोनवणे शेखर पटेल पत्रकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर महाजन यांनी मानले. यावेळी बैठकीत पोलीस पाटील संघटनेच्या नुतन पदाधिकाराऱ्यांचे स्वागत करण्यात आले.