यावल प्रतिनिधी विकी वानखेडे
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी तथा सदया बीएसएफ मधे सहा उप निरीक्षक/मंत्रा पदावर कार्यरत असलेले विरावली चे सुपुत्र महेंद्र पुंडलिक पाटील यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अभ्यासा सोबत अर्धसैनिक दलात भर्ती होनेचे आधी विविध अर्द्ध सैनिक बलांची ओळख तसेच स्पर्धा परीक्षा करिता कशी तयारी करावी या विषयावर उपस्थित विद्यार्थी ना मार्गदर्शन केले।
कार्यक्रम चे सुरवातिला प्रा.संजय पाटील यानी सैनिक महेंद्र पाटील यांचे द्वारे तालुक्यातिल शहीद सैनिक परिवार यांचे परीवारां करिता पेंशन सम्बन्धी केलेल्या कार्य चे व दोन दीवसापूर्वी पाळधी येथे जलगांव/धूले/नंदुरबार जिल्हा माजी अर्धसैनिक जवान यांचे कडून आपल्या यावल तालुक्यातिल सैनिक महेंद्र पाटील यांचा सत्कार हा आपल्या महाविद्यालय व तालुका करिता गौरवास्पद बाब आहे हे संगितले व या कार्य निमित्त महाविद्यालया चे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यानी सैनिक महेंद पाटील यांचा विशेष कौतुक व सत्कार केला। हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला सूत्रसंचलन आयोजन उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एमडी खैरनार यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डी. एन. मोरे, प्रा. सि. के. पाटील, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. शेखर चव्हाण, प्रा. मनोज पाटील यांनी सहकार्य केले.