रमाई आवास घरकुल योजनेमध्ये होत असलेल्या अन्याय  विरोधात आमरण उपोषण

 

इस्माईल शेख शेगाव

नगर परीषद शेगांव येथील अनुसूचित जाती बौध्द बेघर अपंग विधवा महिला अतिवृष्टी धारकांवर गोरगरीब आर्थिक दुर्बल लोकानवर रमाई आवास घरकुल योजने मध्ये स्थानिक न. प. चे तात्कालीन सत्ताधारी व अधिकारी लोकांन कडुन होत असलेल्या अन्याय व जातीय भेदभाव करत असल्यानी शासनाने यांची तात्काळ दखल घेऊन रमाई आवास घरकुल योजनेचे मंजुर२७०अधीक ३२लोकांचे आर्थिक निधी देऊन जातीय भेदभाव करणाऱ्या लोकांनवर अॅट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हादाखल करून कार्यवाही करण्यात यावी.

या मागणीसाठी अंबादास भगवान गावई व महादेव बारिकराव शेगोकार व विनोद पांडुरंग मोरे (दिव्यांग) यांनी स्थानिक गांधी चौक येथे दि.१० जानेवारी रोजी आमरण उपोषणास सुरवात केली आहे.
नगर परीषद शेगांव येथे अनुसूचित जाती व बौध्द बेघर अपंग विधवा महिला ,अतिवृष्टी धारकांवर गोरगरीब आर्थिक दुर्बल लोकांचे रमाई आवास घरकुल योजने मध्ये मंजुर २७० अधीक ३२ घरे आहेत.

अनुसूचित जातीचे असल्यानी न. प. चे तात्कालीन सत्ताधारी व संबंधी अधिकारी वर्गा यां लोकांन सोबत, जातीय भेदभाव करुन घर मिळवण्यात अडथळे निर्माण करत आहे. आणि हि केवळ जातीय भेदभावातुन होत आहे. हा अनुसूचित जाती व बौध्द बेघर लोकावर जाणीवपूर्वक अन्याय आहे.असा आरोप उपोषणकर्ते यांनी पत्रकार परिषदेत केला.

यां अन्यायाने अनुसूचित जाती व बौध्द बेघर ,अपंग विधवा महिला अतिवृष्टी धारकांवर, गोरगरीब, आर्थिक दूर्बल लोकांकडे पक्के घर नसल्याने व अत्यंत अर्थिक दुर्बल असल्याने आणि निवार्याची व्यवस्था नसल्याने यांचे व यांच्या कुटंबाचे जीवन धोक्यात आले आहे. आम्हि यांबाबत विनंती करून सुचना केलेल्या आहेत.

तरी सुध्दा जातीय भेदभाव यां लोकांवर थांबलेला नाही.शासनाला वारंवार स्मरण पत्र देवुन सुध्दा आम्हाला न्याय मिळत नाही म्हणुन न्यायासाठी आमरण उपोषणास बसलो असे ही ते म्हणाले.

रमाई आवास घरकुल योजने पासुन वंचित आहेत. शेगांव न. प. मध्ये रमाई आवास घरकुल योजनेत या आधी २०१८ – १९ मंजुर यादी मध्ये पात्र लाभार्थांना डावलून नाव मध्ये फेरफार व भ्रष्टाचार करुन वंचित ठेवाण्यात आले आहे. व २०१६ ते २०२२ पर्यंत आतची अनुसूचित जाती जमाती नवबौध्द ( पुर्वाची दलित वस्ती सुधार योजनमध्ये) शासनाच्या कोटयावधी रुपयाचे आर्थिक निधीचे अफरातफर करुन भ्रष्टाचार केलेला आहे.

तरी शासना कडुन २०१६ ते २०२२ पर्यंत संपुर्ण झालेल्या व चालु असलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, आणि न. प. मध्ये जणिव पुर्वक भ्रष्टाचार व शासनाच्या आर्थिक निधेचा गैरवापर करण्यासाठी पात्र व अनुभवि बांधकाम अभियता नसल्यां मुळे तात्कालीन न. प. सत्ताधारी व अधिकारी लोकांनी आताचे बांधकाम अभियता पात्र व अनुभवि नसल्यामुळे हाताशी धरुन योजने मध्ये फारमोठया प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.

यांमुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे. तरी सखोल चौकशी करुन यांच्यावर तात्काळ कार्यावाहि कारण्यात यावी व अनुसूचित जाती बौध्द बेघर अपंग विधवा महिला अतिवृष्टी धारकांवर गोरगरीब आर्थिक दुर्बल लोकानवर रमाई आवास घरकुल योजनेचे मंजुर २७० अधीक ३२ घराचे अनुदान तात्काळ दि, ०८/०१/२०२३पर्यत देण्यात यावे. करिता न्यायासाठी लोकशाही मार्गाने दि, १० / ०१ / २०२३ पासुन मंजुर२७० अधीक ३२यां मध्येल लाभार्थि व मी न्यायासाठी अमरण उपोषण न. प. कार्यालया समोर गांधी चौक शेगांव जिल्हा बुलढाणा येथे बसलो आहे. यांची शासनाने दखल घ्यावी अशी मागणि अंबादास भगवान गवई (समाजसेवक) , महादेव बारिकराव शेगोकार , विनोद पांडुरंग मोरे (दिव्यांग) यांनी यावेळि केली.

Leave a Comment