काँग्रेस अध्यक्ष वाढदिवस निमित्त आशाताई,सफाईकर्मी सत्कार कार्यक्रम संपन्न
(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : नामदार विजयभाऊ वड्डेटीवार म्हणाले की गेली पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या विकास पुरुषांनी या शहराला विकासा पासून वंचित ठेवले मात्र आज या शहरात राजु रेड्डी चा नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्य हे खरंच कौतुकास्पद आहे.
राजकारणा पलीकडे जाऊन केवळ समाजकारणाचे असल्याने मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
या घुग्गुस शहरात लोक संख्या जास्त असून या गावात अग्निशमन वाहन नव्हते आज या गावा करिता अग्निशमन दिले आहेत असे प्रतिपादन केले.
किशोर भाऊ जोरगेवार म्हणाले
पक्ष भावना बाजूला ठेवून काँग्रेस नेत्यांच्या वाढदिवसाला या मंचावर उपस्थित झालो हे केवळ रेड्डी करिताच आज ही अर्ध्या रात्री याचा फोन येतो तो केवळ कुठल्या तरी रुग्णाला शासकीय रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी येथे आपल्या खाजगी कामासाठी या माणसाने कधीच फोन केला नाही. असे अपले मत सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून शहराला मोफत पाणी पुरवठा करण्याचे कार्य हे प्रशंसनीय असल्याचे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजूरेड्डी यांचा चाळीस वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात सेवा दिन म्हणून साजरा केला.
कोरोना काळात आपल्या जीवाची कुटूंबाची ना बाळगता दिवस रात्र सेवा देणाऱ्या ‘आशा’ सेविका,अंगणवाडी सेविका यासोबतच समाजात तिरस्कारांच्या दृष्टीने बघितल्या जाणाऱ्या नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना उचित सन्मान देण्यासाठी राज्याचे बहुजन विकास मंत्री नामदार विजय वड्डेटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार करण्यात आला व दिव्यांग बांधवाला तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमात सौ.पुष्पा नक्षिणे,सौ.पदमा त्रिवेणी,सौ.पुष्पा कणकम यांच्या माध्यमातून शेकडो महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अरविंद चंहादे,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी, अविनाश गॉगुर्ले ,संदीप चटकी,यांच्या माध्यमातून शेकडो युवक पुरुषांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत रेड्डी यांचा सह परिवार केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला
याप्रसंगी मंचावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,सेवा दल सूर्यकांत खणके, नगराध्यक्ष सुरेश माकुलकर,श्यामकांथ थेरे,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले तर सूत्र संचालन सुनील माहुरे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन दंतलवार,रोहित डाकूर,अनुप भंडारी,बालकिशन कुळसंगे,देव भंडारी,कपिल गोगला,कुमार रुद्रारप,संजय कोवे,बल्ली भाई,आकाश चिलका,शाहरुख शेख, सचिन नागपुरे,रफिक शेख,दीपक पेंदोर,सुनील पाटील,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे, अय्यूब कुरेशी, विजय रेड्डी, नागेश कुचनकर,राहुल पंधरे,प्रदीप आसेकर,जाफर शेख,प्रणय लिंगांपेल्ली,विशाल नागपुरे,विशाल लोणगाडगे, सुबोध आवळे,राकेश डाकूर, यांनी अथक परिश्रम घेतले.