राज्यातील अन्नदाता शेतकरी बांधवांना पिकांसाठी लागणारे रासायानिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती कमी करा मनसेने पाठविले कृषीमंत्र्यांना पत्र.

0
264

यावल ( प्रतिनिधी ) विक्की वानखेड़े

संपुर्ण देशावर कोरोना विषाणुसंसर्गाचे संकट ओढवले असुन , या महामारीच्या काळात सर्वसामान्यापासुन तर देशाचा अन्नदाता बळीराजा देखील दुहेरी आर्थीक संकटात आले असतांना केन्द्र शासनाच्या गोंधळलेल्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे यंदाचे खरीप हंगामाच्या पिकपेरणीनंतर लागणारी रासायनीक खतांची वाढलेली किमत ही शेतकऱ्यांचे कमरडे मोडणारी आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी राज्याचे कृषीमंत्री ना . दादासाहेब भुसे यांना निवेदन पाठवुन या भरमसाठ वाढलेल्या खतांच्या किमती या नियंणत्रात आणाव्यात अशी मागणी केली आहे . याबाबत दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळ्कर यांनी राज्याचे कृषीमंत्री यांना म्हटले की , यावर्षी सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यानी भरमसाठ किमती वाढवल्या असुन , पन्नास किलोच्या बॅगवर सुमारे ६००ते ७०० रुपये मोठी वाढ केलेली असुन, ऐरवी रासायनिक खतांची नैसर्गीक वाढ बघता१ooते २ooरूपये प्रमाणे वाढ होणे हे अपेक्षीत होते पण ही मोठया प्रमाणावर वाढलेली खतांची वाढ शेतकऱ्यांची पिकपेरणी संदर्भातील आर्थिक नियोजन कोलमडणारी असुन , या विषयाला घेवुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे . इतक्या मोठया प्रमाणावर रासायनिक खतांच्या किमती वाढण्याची ही पहीलीच वेळ असुन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी किसान सम्मान योजनेअंतर्गत दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानात केवळ एकच खताच्या बॅगवर खर्च होणार आहे . खतांच्या वाढलेल्या दिडपट किमतीमुळे शेतकरी बांधव कमालीच्या अडचणी येणार असुन , शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला आहे ते आधार भुत किमती मात्र जैसे थेच आहे . राज्याचे कृषीमंत्री म्हणुन शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या तोंडावर वाढलेल्या किमती मुळे आर्थीक बोजा वाढणार असुन या संदर्भात आपण केन्द्रीय कृषीमंत्री यांच्याशी बोलुन तात्काळ ठोस पाऊल उचलावित अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी हितासाठी व न्याय मिळुन देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे चेतन अढळकर यांनी म्हटले आहे .

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here