राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला

0
1147

 

SURYA MARATHI NEWS

विक्की वानखेड़े जळगाव जिल्ह्या प्रतिनिधि

चांगदेवजवळ (ता. मुक्ताईनगर) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. आज रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या हल्ल्यात रोहिणी खडसे (rohini khadse) यांना दुखापत झाली नसून कारवर रॉडने काचा फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जळगाव पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर ( Rupali chaknkar) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला, एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली

या गेल्या दोन दिवसात शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील व खडसे यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. एकनाथ खडसे eknath khadse आणि रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. त्यानंतर आज रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. Surya marathi news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here