राहुल नायसे यांच्या आमरण उपोषणाची लेखी आश्वासनाने सांगता…

0
287

 

आज दि.21 डिसेंबर 22 रोजी संग्रामपुर शहरातील युवा नेतृत्व राहुल नायसे यांचे दुकानांवरील 11 KV लाईन कनेक्शन शिफ्टिंग करण्याबाबत महावितरण कार्यालय संग्रामपुर येथे आमरण उपोषण उपकार्यकारी अभियंता संग्रामपुर यांच्या लेखी आश्वासनाने मागे घेण्यात आले आहे.

विशेषतः आज संताजी महाराज पुण्यतिथी आणि राहुल नायसे यांच्या आक्रमकतेला यश आले त्याबद्दल त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आणि असेच युवक परिवर्तन घडवून आणू शकतात हे पुन्हा एकदा दिसून आले.

उपोषणस्थळी शेतकरी नेते प्रशांत डिक्कर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय मारोडे,संग्रामपुर मित्र परिवाराचे अध्यक्ष उमाकांत शिरसोले सर,आंबलके महाराज,गणेश मानखैर,गौरव गांधी,मोहन सुलताने,राहुल शिरसोले,शिव उमाळे अतुल वानखडे हमीद पाशा प्रकाश येनकर तसेच संग्रामपुर शहरातील सन्मा.नगरसेवक ज्येष्ठ मंडळी युवा कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती  होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here