लोकजागर ओबीसी जनगणना सिल्लोड तालुका समन्वयक पदी प्रा.सागर जैवाळ यांची निवड.

0
355

 

सूर्या मराठी न्युज प्रतिनिधी.

आमची जनगणना आम्हीच करणार या ऐतिहासिक सत्याग्रहात सहभागी धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा व तालुका समन्वयक यांची अधिकृत यादी लोकजागर चे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी जाहीर केली
लोकजागर अभियान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबर 2020 पासून  आमची जनगणना आम्हीच करणार या ओबीसी जनगणना सत्याग्रहाची सुरवात झालेली आहे.त्यानिमित्त गाव वार्ड समन्वयक ,तालुका समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांची नेमणूक सुरू आहे.
प्रा.सागर जैवाळ यांची सिल्लोड तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.
केंद्र सरकार गेल्या नव्वद वर्षा पासून टाळाटाळ करीत असल्यामुळे
आमची जनगणना आम्हीच करणार ही भूमिका घेऊन लोकजागर चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी ओबीसी बांधवांनी मानसिक गुलामगिरी झुगारून जाती निहाय जनगणना सत्याग्रहात सहभागी व्हावे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here