वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार कोजागिरी पौर्णिमेपासून काकडा आरतीस प्रारंभ

0
436

 

बुलढाणा जिल्हातील जळगाव येथील हनुमान मंदिर वाडी खुर्द येथून पहाटे सकाळी 5 वाजता काकडा आरती निघून श्री संत सखाराम महाराज मंदिर पाटील नगर, आसरा माता मंदिर, देशमुख वाडी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गंगा नगर मधून मार्गक्रमण करीत बोचरे नगर, रामनगर मधून हनुमान मंदिरात पोहोचते,दरम्यान भक्त रस्त्याने संतांचे अभंग, गवळणी गात टाळ, विणा मृदंगाच्या निनादात हरी नामाचा गजर करीत असल्याने पहाटेचे वातावरण प्रसन्न होऊन जाते. रस्त्याने माता-भगिनी घरासमोर सडा समार्जन करून रांगोळी काढून दिवे लावून आरतीचे स्वागत करीत असतात. या काकडा आरती मध्ये नंदकिशोर निमकर्डे, भगवान आतकरे, हरिभाऊ कंकाळे, दत्तात्रय ठाकुर, संजू गावंडे, अतकारे, मंगेश बावस्कारसह बालगोपाल अबालवृद्ध 25 ते 30 वारकरी सहभागी असतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here