विहिरित सापडल्या मुलगा, मुलीचा मुर्तुदेह

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण

बिड- बिड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माटेगाव शिवारातील एका विहीरीमध्ये एका अल्पवयीन मुला व मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विहीर मालक सुधाकर चव्हाण यांना ते मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर त्यांनी याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यास माहिती कळवली. शुभम रोहिदास कापसे वय (17 ) पुणे येथे शिक्षण घेत होता व कावेरी राजेंद्र खंदारे वय (16) वर्षे अशी त्या मृतांची नावे आहेत. कावेरी ही सध्या तिच्या मामाच्या घरी माटेगाव येथे राहत होती.
या आत्महत्या आहेत की घातपात याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत. या प्रकरणाचा तपास चकलांबा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व पोलीस कॉन्सटेबल अमोल औसरमल करत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उमापुर येथील उप आरोग्य केंद्रात दाखल कले आहेत .

Leave a Comment