शिंदी येथील शेत शिवारात रोह्याचा हैदोस ! शेतकरी त्रस्त वन विभागाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी !

 

सिंदखेड राजा । (सचिन खंडारे)

अगोदरच शेतकरी अतिवृष्टीच्या संकटातून सावरत नाही तोच हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता !त्यामध्ये अनेक पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता !खरिपाच्या दुबार तिबार पेरणी करूनही हातात काहीच राहिले नव्हते !परंतु पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणी कडे वळला !यामध्ये गहू हरभरा मका ‘हायब्रीड मिरची शेतकरी रब्बी हंगामात घेऊ लागला !परंतु ही पिके ही जंगली प्राण्यांमुळे नेस्तनाबूत होऊ लागली आहे !शिंदी शिवारातील अनेक शेतांमध्ये दोनशे रोहींचा कळप असून शेतकऱ्यांचे हायब्रीड गहू व हरभरा अशा पिकांचे नुकसान करत आहे !अनेक शेतकऱ्यांची पिके फस्त केली आहे :त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे !तरी वन विभागाने त्वरित यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे ‘अन्यथा वन विभागाच्या कार्यालय मध्ये आम्ही ठाम मांडून बसू असा इशारा नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे ‘बरोबर यामध्ये किशोर बंगाळे तेजराव खरात राजेश खंडारे भगवान गवई समाधान गवई असे 25 ते 30 शेतकऱ्यांनी यावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ।

Leave a Comment