संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी संपन्न,,

0
234

हिंगणघाट मलक नईम

श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने संत सावता महाराज मंदिर, शहालांगडी रोड विठ्ठल गुळघाणे लेआउट, सावता नगर, हिंगणघाट येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री संत सावता माळी ट्रस्ट द्वारा आयोजित करण्यात आला. पहाटे पाच वाजता काकड आरती व घट स्थापना करण्यात आली. त्या नंतर कीर्तनकार ह भ प जगन महाराज नेहारे, सेलू मुरपाड, साथकरी व विणेकरी शुभम महाराज थुटे, ऋषिकेश महाराज बेदी, मृदंग वादक सेवादास महाराज राठोड, यवतमाळ, संवेदिनी वादक व गायनाचार्य रुपेश महाराज तळवेकर, सेलू काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल्याचे कीर्तन पार पडले. यावेळी साथकरी म्हणून यशवंत महाराज तपासे, कुणाल महाराज हरणे, रुपेश महाराज डोंगरे, देविदास महाराज लाकडे, मोहन महाराज गंडाईत, वैभव महाराज हरणे, समीर महाराज भजभूजे, यश महाराज सहारे उपस्थित होते. त्याच प्रमाणे या कार्यक्रमाला हेमराज हरणे, ज्ञानेश्वरराव वाळके, कृष्णा मुंगले, शंकर झाडे, देवीदासजी मोहूरले, नरेश खर्डे, मनोज घंगारे, केशव तितरे, जयंत मानकर, चंद्रशेखर सहारे, विनोद फाटे, दिलीप भोंगाडे, सुरेश वाळके, अंकुश सोनकुसरे, जनार्दन निखाडे, रमेश साबळे, अभिषेक आंबटकर, नर्मदाबाई झाडे, शकुंतला वाघ, ताराबाई कपाटे, बेबीबाई महाजन, ज्योतीबाई सहारे, छायाबाई पाटील, कमलाबाई धोटे व समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमा चा समारोप काला प्रसाद वाटप करूण करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here