उषा पानसरे कार्यकारी संपदिका मो. 9921400542
होणार,रस्ते खराब करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर शासन काय कार्यवाही करणार?आमदार रवी राणा यांचा विधानसभेत संतप्त सवाल*
*समृद्धी महामार्गाच्या विकासासाठी जमिनी दिलेल्या काही शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला नाही,अनेक शेतकरयांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे,असे शेकडो शेतकरी मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत, सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री याची दखल घेऊन या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय देणार का?आमदार रवी राणा यांचा विधानसभेत खडा सवाल*
या खराब झालेल्या 26 रस्त्यांपैकी काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग तर काही जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आहेत,संबंधित कंत्राटदाराकडून ही रक्कम घेऊन ती संबंधित विभागाकडे तात्काळ वळती करावी जेणेकरून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करता येईल व नागरिकांना होणारा त्रास आणि वाहनांचे होणारे नुकसान वाचेल -आमदार रवी राणा यांची सभागृहात सूचना
सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन आजच सदर रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देत असल्याचे सभागृहात जाहीर केले व ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत किंवा ज्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे अश्या सर्व शेतकऱयांना घेऊन आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात आपल्या दालनात तात्काळ बैठक लावून या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे अभिवचन सुद्धा यावेळी मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सभागृहात दिले
आमदार रवी राणा यांनी समृद्धी महामार्ग निर्मितीमुळे 26 रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीचा व शेतकरी हिताचा प्रश्न उपस्थित केल्याने आंदोलक शेतकरी व नुकसानग्रस्त नागरिकांना न्याय मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत,संबंधित शेतकरी व नागरिकांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानले आहे.







