लोणार तालुक्यातील सरस्वती येथे जागेच्या वादावरुन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सरस्वती येथील चंद्रभागा भुजंग अंभोरे या महिलेने पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की जागेच्या वादावरुन भांडण झाले असता पतीने भावकीतील लोकांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता या जुन्या वादाच्या कारणावरून शीलवंत अंभोरे, रतन अंभोरे, चंद्रमुखी अंभोरे, रेखा अंभोरे, सोनू अंभोरे ,अर्चना अंभोरे, तेजराव अंभोरे यांनी पतीला घराच्या दारात येऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हातात वीट घेऊन बरगडीवर पाठीवर, काठीने पोटावर पाठीवर मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली महिलेच्या तक्रारीवरून सरस्वती येथील ७ जणांविरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 47/ 2022 कलम 143, 147, 148, 149 ,323, 324, 504, 506 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस गजानन सानप करीत असल्याची माहिती 25 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



