साईबाबा नागरी सह पत संस्थेची 18 वी सभा संपन्न .

0
404

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

आज दिनांक 17 /10/ 2021 रोजी यावल येथील खरेदी-विक्री संघातील सभागृहात साईबाबा नागरी सहकारी सकाळी 10 वाजेला साई बाबा नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेची 18 वी सर्वसाधारण सभा कोरोना चे सर्व नियम व अटींचे पालन करून आयोजन केले होते या 18 व्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी साईबाबा संस्थेचे संस्थापक चेअरमन आबासाहेब भाऊराव माणिकराव पाटील होते या सर्वसाधारण सभेला सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या उपस्थिती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम अध्यक्षांच्या व संचालक मंडळ च्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . मागील वर्षात मातृभूमीच्या संरक्षणासाठी वीरगती प्राप्त झालेले जवान सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते शिक्षणतज्ञ थोर नेते कलावंत तसेच संस्थेचे सभासद त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ठेवीदार हितचिंतक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या थोर विभूती तसेच ज्ञात-अज्ञात व्यक्ती कुरणात मृत्युमुखी पावलेल्या व्यक्ती यांच्या पवित्र स्मृतीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सर्व चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी आपली मनोगत व्यक्त करत गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार करत अध्यक्ष भाऊराव पाटील यानी कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तापिक साईबाबा पतसंस्थेचे माजी संचालक ऍड देवकांत पाटील यांनी तर संस्थेचे संचालक दिनकर क्षीरसागर यांनी सर्व उपस्थित सभासदाचे आभार मानले सभेसाठी प्रमुख मान्यवर विरावली वि का सा चे माजी चेरमन पीक संवरक्ष चे संचालक गोरख पाटील ,दहिगाव चे बी डि पाटील छत्रपती फाऊंडेशन चे संचालक गिरीष पाटील , राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष पवन पाटील आदी उपस्थित होते सभा घेण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक प्रफुल्ल देशमुख संस्थेचे कर्मचारी महेश बोरसे , हेमचंद्र मोरे ,चंद्रकांत बारी , रवींद्र कोळी आदींनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here